Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 26 May 2015

अंकशास्त्र: मार्क झुकेरबर्ग


महावीर सांगलीकर 
8149703595


फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या जीवनात 5 आणि 4 हे अंक परत परत आले आहेत. त्यांची  जन्मतारीख 14 मे 1984 ही आहे. त्यांचा जन्मांक 5 आहे आणि भाग्यांकही 5 आहे. त्यांचा जन्ममहिना मे हाही वर्षातला 5वा महिना आहे.

5 हा अंक मिडिया, एक्सप्रेशन (व्यक्त होणे), मैत्री, देवाणघेवाण या गोष्टींशी संबधीत आहे. मार्क झुकेरबर्ग
यांची फेसबुक ही कंपनी नेमकी याच गोष्टींशी संबंधीत आहे. झुकेरबर्ग यांनी आपल्या नंबरला शोभेल असाच व्यवसाय निवडल्याने त्यांना तो चांगलाच लाभदायक ठरला असे दिसून येते. ( विशेष म्हणजे Media  या शब्दाची अंकातली किंमत 5 येते ).

5 जन्मांक किंवा भाग्यांक असणा-यांची मैत्री 8 हा जन्मांक किंवा भाग्यांक असणा-या व्यक्ति वगळता सगळ्यांशीच होत असते. पण त्यातही 5 किंवा 4 हा जन्मांक/भाग्यांक असणा-यांशी जास्त होत असते. त्यांना 5 आणि 4 हे अंक इतर कोणत्याही अंकापेक्षा जास्त लाभदायक ठरतात. 

आता पुढील अंक पहा:

-मार्क झुकेरबर्ग यांची जन्मसाल असणा-या 1984 मधील अंकांची बेरीज 4 आहे. 14.5.1984 या पूर्ण तारखेत 4 हा अंक दोन वेळा आला आहे.
-Facebook या नावाचा नामांक 4 येतो. (2 अंकी नामांक 31 येतो) 
-Facebook ची स्थापना 4 फेब्रुवारी 2004 रोजी झाली. 
-वयाच्या 23व्या वर्षी मार्क झुकेरबर्ग बिलियानिअर झाला. 23=2+3=5 
-2012 मध्ये फेसबुकची सदस्यसंख्या 1 अब्ज झाली झाली. 2012=2+0+1+2=5
-फेसबुकने विकत घेतलेल्या Whats App या कंपनीच्या नावाची अंकातली किंमत 4 येते. (दोन अंकी किंमत 31).
- Whats Appचे संस्थापक जान कौम यांचा भाग्यांक 4
-मार्क झुकेरबर्ग यांची पत्नि प्रिसिला चॅन यांची जन्मतारीख 24 फेब्रुवारी 1985 ही आहे. तिचा भाग्यांक 4 आहे. -तिचा दोन अंकी भाग्यांक 31 आहे. तिचे जन्मसाल असलेल्या 1985 मधल्या अंकांची बेरीज 5 आहे. 
-मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला चॅन यांचे लग्न 19 मे 2012 रोजी झाले. (मे= 5वा महिना, 2012=5).


आणखी एक अंक: 
मार्क झुकेरबर्ग यांच्या लग्नाची तारीख 19, Whats App विकत घेतल्याची तारीख 19. 

हेही वाचा :


No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख