-महावीर सांगलीकर
8149703595
रिझर्व बँकेनं काढलेल्या नवीन नोटांवर या बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या सहीचं तुम्ही नीट निरीक्षण केलंत तर तुम्हाला पुढील गोष्टी लक्षात येतील:
1. त्यांनी आपल्या Urjit या नावावर काट मारली आहे.
2. सहीच्या शेवटी ते खाली आणि मागे वळले आहेत.
3. सहीमध्ये अंडरलाईन सलग नसून तुटक आणि वेगळी-वेगळी आहे.
4. सहीमध्ये अनेक ठिकाणी फुल्या (crosses) तयार झाल्या आहेत.
5. त्यांच्या सहीमध्ये दोन वेळा आलेले t हे अक्षर पहा. या अक्षरातली आडवी रेघ (t bar) ही उतरती आहे.
उर्जित पटेल यांच्या सहीमध्ये वर दिलेल्या वैशिष्ठ्यांचे अर्थ पुढील प्रमाणे आहेत:
1. आपल्या नावावर काट मारणे: ग्राफॉलॉजी (हस्ताक्षर विश्लेषण शास्त्र) मध्ये अशा प्रकारच्या सहीला ‘सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह सिग्नेचर’ किंवा 'सुसायडल सिग्नेचर' म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारची सही करणारे लोक स्वत:च स्वत:चे मोठे नुकसान करून घेऊ शकतात. पटेल पुढे मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे अडचणीत येणे म्हणजे नोट बंदीचा घेतलेल्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊन पटेल यांनी राजीनामा देणे किंवा त्यांची हकालपट्टी होणे असं घडू शकतं. कदाचित यापेक्षाही भयानक गोष्ट होऊ शकते.
2. सहीच्या शेवटी खाली येणं आणि माघारी वळणं: हा प्रकार वरील प्रकाराला पूरक आहे. अशा प्रकारची सही करणाऱ्याला आयुष्यात मोठा सेटबॅक बसू शकतो.
3. सलग अंडर लाईन नसणं: सात्यताचा अभाव
4. फुल्या (crosses): निर्णयात चुका होणं
5. उतरता टी बार: याचा अर्थ कामात फारसा उत्साह नसणं.
एकूणात उर्जित पटेल हे बळीचा बकरा बनण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
No comments:
Post a Comment