-महावीर सांगलीकर
मोबाईल नंबर: 9145318228
अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तिची जन्मतारीख आणि नाव यावरून त्या व्यक्तीचे गुण, दोष, स्वभाव ओळखण्याचे साधन आहे. प्रत्येक व्यक्तिची जन्मतारीख म्हणजे एक अंक असतो. त्याच प्रमाणे नावाचाही एक अंक असतो. प्रत्येक अंकाचे कांही गुण आणि कांही दोष असतात. या अंकाचा त्या-त्या व्यक्तीच्या स्वभावावर, विचार करण्याच्या पद्धतीवर आणि त्यामुळे जीवनावर प्रभाव पडत असतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून आणि नावावरून त्याचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, तिचा स्वत:कडे व इतरांकडे पहाण्याचा दृष्टीकोन, येणा-या परिस्थितीला ती व्यक्ति कशा प्रकारे सामोरी जाईल आणि आणि ती व्यक्ति कोणत्या प्रकारचे जीवन जगेल याचा साधारण अंदाज बांधता येतो. हा अंदाज बांधण्यासाठी 1 ते 9 या अंकांचा वापर केला जातो.
एखाद्या व्यक्तीच्या अंकशास्त्रीय वाचनावरून त्याचे मूलभूत गुण आणि दोष कळल्यामुळे त्यानुसार त्या व्यक्तीला आपल्या गुणांचा विकास करण्यासाठी आणि दोषांना काबूत ठेवण्याविषयी मार्गदर्शन करता येते. त्याला कोणते शिक्षण, रोजगार, व्यवसाय फायदेशीर ठरतील हे ठरवता येते. आयुष्याचा जोडीदार, व्यवसायातील भागीदार निवडताना अंकशास्त्राचा उपयोग होतो. एखाद्या व्यक्तीस कोणती वर्षे, कोणत्या तारखा अनुकूल अथवा प्रतिकूल असू शकतात याचा अंदाज बांधता येतो.
याशिवाय एखाद्या व्यक्तीला कोणते अंक फायदेशीर आहेत, कोणत्या तारखेस जन्मलेल्या व्यक्ति तिला मित्र, पार्टनर, जोडीदार म्हणून चांगले ठरतील, कोणते वार आणि तारखा तिला चांगले आहेत, पुढील काळात येणारी कोणती वर्षे तिला महत्वाची ठरतील, त्या व्यक्तीस कोणते करीअर, कोणता व्यवसाय लाभदायक ठरेल, तिने कोणते रंग वापरल्यास फायदा होईल अशा अनेक गोष्टी अंकशास्त्राचा उपयोग करून सांगता येतात.
एखाद्या व्यक्तीच्या नावात किंवा नावाच्या स्पेलिंग मध्ये दोष असेल तर अंकशास्त्राच्या सहाय्याने ते नाव अथवा स्पेलिंग बदलता येते.
हेही वाचा:
No comments:
Post a Comment