-महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
Numerologist & Motivator
Mobile Phone 8149703595
नरेंद्र दाभोलकर आणि अब्राहम कोवूर हे दोघे अंधश्रद्धा निर्मूलन या क्षेत्रातले महनीय व्यक्ति होते. दोघांचे जीवनकार्य एकाच प्रकारचे होते. खरे म्हणजे दाभोलकर यांनी अब्राहम कोवूर यांचे कार्य पुढे नेले. विशेष म्हणजे या दोघांचा जन्मांक आणि भाग्यांक समान होता!
अब्राहम कोवूर यांची जन्मतारीख: 10.4.1898
जन्मांक 1
भाग्यांक 4
नरेंद्र दाभोलकर यांची जन्मतारीख: 1.11.1945
जन्मांक 1
भाग्यांक 4
आता आपण अंकशास्त्रानुसार 1 आणि 4 या अंकाचे गुण पाहू.
1= नेतृत्व, पुढाकार, संघटन शक्ति, आपल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याची क्षमता.
4= तर्कनिष्ठ आणि चिकित्सक विचारसरणी, स्पष्टवक्तेपणा, विद्रोही वृत्ती, उच्च बुद्धिमत्ता
अब्राहम कोवूर आणि नरेंद्र दाभोलकर या दोघांमध्ये 1 आणि 4 या अंकांचे गुण मोठ्या प्रमाणात होते हे त्यांच्याविषयी वाचले असता दिसून येते.
आता आपण या दोघांच्या मृत्यूची तारीख बघू.
अब्राहम कोवूर: मृत्यू: 18.09.1978
या तारखेतील अंकांची बेरीज 43
43 = 4+3 = 7
नरेंद्र दाभोलकर: मृत्यू: 20.08.2013
या तारखेतील अंकांची बेरीज 16
16 =1+6 =7
अंकशास्त्र वगैरे गोष्टी न पटणारे अनेकजण याला नेहमीप्रमाणे केवळ योगायोग म्हणतील. पण दोघांचे जन्मांक आणि भाग्यांक सारखेच असणे, त्या त्या अंकांचे गुणदोष त्या दोघांच्यात प्रखरतेने दिसणे आणि दोघांनीही एकाच प्रकारचे काम करणे हा योगायोग नसून त्यांच्या जन्मतारखेमुळे त्यांच्या विचारांना, कार्याला एकसारखी दिशा मिळाली हे आहे. शिवाय दोघांच्या मृत्युच्या तारखेत साम्य असणे ही गोष्ट देखील विचार करण्यासारखी आहे.
हेही वाचा:
विज्ञान म्हणजे काय? गूढ विद्या आणि विज्ञान
अंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका
अनिसचे विद्वान(?) लेखक आणि अंकशास्त्र
No comments:
Post a Comment