Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 24 April 2015

मास्टर नंबर 11

महावीर सांगलीकर 
मोबाईल फोन: 914 531 8228


मागील लेखात म्हंटल्याप्रमाणे 11 हा एक मास्टर नंबर आहे. तुमचे जन्मतारीख 11 असल्यास किंवा तुमच्या पूर्ण जन्म तारखेची दोन अंकी बेरीज 11 येत असल्यास तुमच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 11 हा मास्टर नंबर आहे. 

ज्यांच्या चार्टमध्ये  11 हा मास्टर नंबर येतो, त्या व्यक्ति एक्स्ट्रा- ऑर्डिनरी असतात. त्यांच्यामध्ये अतिशय उच्च दर्जाची आध्यात्मिकता आणि नेतृत्व गुण असतात. कांहीतरी भव्य-दिव्य करण्याची इच्छा आणि ताकत त्यांच्यात असते. ती इच्छा आणि ताकत त्यांनी वापरात आणली तर त्यांच्या हातून मोठ-मोठी कामे होतात.

या व्यक्तिंमध्ये Intuition Power असते. इतरांना ज्याचा अंदाज येणार नाही, अशा अनेक गोष्टी त्यांना आगाऊ  कळतात. त्यांना नवीन नवीन कल्पना सुचतात आणि त्यांनी प्रयत्न केला तर त्या अमलात येऊ शकतात.

या व्यक्ति अतिशय संवेदनशील असतात. त्यांचे बालपण अडचणींचे गेले असल्यास बहुधा या व्यक्ति मोठेपणी कांहीशा अबोल बनतात.

मास्टर नंबर 11 ची दुसरी बाजू म्हणजे या व्यक्ति अति आदर्शवादी, अव्यवस्थित असू शकतात. कित्येकदा त्यांच्या अपेक्षा वास्तवतेला धरून रहात नाहीत. त्यांच्यातील अनेकजण धर्म, कर्मकांड यांच्या आहारी जाण्याची शक्यता असते.

आपल्या क्षेत्रात उच्च पदाला पोहचण्याची क्षमता 11 हा मास्टर नंबर असणा-या लोकात दिसू येते. त्याची कांही उदाहरणे म्हणजे गुरू नानक, रामकृष्ण परमहंस, थॉमस अल्वा एडिसन, ओशो, विनोबा भावे, किरो, बराक ओबामा, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन इ.


हेही वाचा:
शक्तिशाली मास्टर नंबर्स 
जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29 
मास्टर नंबर 22 
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख