Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 28 February 2016

उद्योगपति भवरलाल जैन

-महावीर सांगलीकर 
8149703595, 9145318228

प्रख्यात उद्योगपति, प्रसिद्ध गांधीवादी आणि जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील वाकोड येथे झाला. त्यांची जन्मतारीख होती: 12 डिसेंबर 1937. त्यांचा जन्मांक 3 तर भाग्यांक 8 येतो.

12=1+2=3
12.12.1937= (1+2) + (1+2) + (1+9+3+7) = (3) +(3) + (20)=26=2+6=8

आता आपण जन्मांक 3 आणि भाग्यांक 8 ची वैशिष्ट्ये पाहू.

जन्मांक 3: प्रसन्न आणि हसरा चेहरा, उत्साह, आकर्षक व्यक्तिमत्व, संयम, सहनशीलता, धैर्य आणि कष्टाळूपणा. हे लोक हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेतात. हा जन्मांक असणा-या व्यक्ति अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रचंड इच्छा शक्ती असणा-या असतात. त्यांना दुय्यम भूमिका करणे आवडत नाही. ते सतत  आपल्या क्षेत्रात एक नंबरवर पोहोचण्यासाठी धडपड करत असतात, आणि त्यात ते यशस्वी होतातही. सर्वोच्च असण्यातली ताकत त्यांना माहीत असते आणि ती ताकत कशी वारायाची हेही त्यांना चांगलेच कळते.

भवरलाल जैन यांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी दिसून येतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक तर होतेच, शिवाय ते अतिशय महत्वाकांक्षी होते. एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी बालपणी अतिशय कष्टात दिवस काढले, आणि आपली महत्वाकांक्षा आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर ‘जैन इरिगेशन सिस्टीम’ या कंपनीची सुरवात करून ती भरभराटीस आणली. ठिबक सिंचन पद्धतीचा प्रचार केला आणि भारतातील व परदेशातील करोडो शेतकऱ्यांना प्रगत शेतकरी बनवले. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतातील व परदेशातील अनेक संस्थानी त्यांना मानाचे पुरस्कार दिले.

जन्मांक 3 हा अंक ‘व्यक्त होण्याशी’ संबधीत आहे. या व्यक्त होण्यात लिखाणाचाही समावेश आहे. भवरलाल जैन यांनी एकूण सहा पुस्तके लिहिली आहेत.

भाग्यांक 8
भाग्यांक 8 हा ‘मनी’ नंबर आहे. हा भाग्यांक असणाऱ्या व्यक्ति अतिशय कष्टातून वर येतात आणि आपले आर्थिक साम्राज्य निर्माण करतात. भवरलाल जैन यांच्या बाबतीत ही गोष्टही दिसून येते.

एकीकडे मनी नंबर असणार 8 हा अंक मानवतावादी आणि सामाजिक बांधिलकी मानणाराही आहे. भवरलाल जैन यांनी अनेकांना मदत तर केलीच, पण त्यांचे मोठे सामाजिक काम म्हणजे त्यांनी जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या भव्य संस्थेत म्युझियम, संशोधन संस्था आणि इतर असे एकूण 30 विभाग आहेत.

नामांक
भवरलाल जैन (Bhavarlal Jain)  यांचा नामांक देखील 3 आहे. त्यामुळे 3 या अंकांचे गुण त्यांच्यात जास्त प्रमाणात दिसतात. त्यांचे पूर्ण नाव भवरलाल हिरालाल जैन (Bhavarlal Hiralal Jain) असे होते. त्यानुसार त्यांचा नामांक 1 येतो. अर्थातच त्यांच्या या पूर्ण नावाने त्यांना त्यांच्या क्षेत्रात एक नंबरवर नेले.   

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख