-महावीर सांगलीकर
मोबाईल फोन 8149703595
1947 नंतर भारत, पाकिस्तान आणि बांगला देश येथील अतिमहत्वाच्या लोकांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. कुणाचा खून झाला, तर कुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. असे खून, मृत्यू हे जास्त करून ठराविक वर्षीच झाले. ही वर्षे म्हणजे 1948, 1966, 1975
आणि 1984. तसेच 1993 साली मुंबई येथे
बॉम्बस्फोट आणि दंगली झाल्या, ज्यात हजारो अनैसर्गिक मृत्यू झाले. या प्रत्येक
वर्षातील अंकांची बेरीज 22 येते! खरे म्हणजे 22 हा अंक वाईट नाही, पण ज्या वर्षातील अंकाची बेरीज 22 येते त्यावर्षी भयानक घटना घडल्या आहेत हेही खरे!
साल 1948
1948=1+9+4+8=22
महात्मा गांधी यांचा खून
पाकिस्तानचे संस्थापक जिना
यांचा (लपवलेल्या) दीर्घ आजाराने मृत्यू
साल 1966
1966= 1+9+6+6=22
पंतप्रधान लाल बहादूर
शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू
अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर
भाभा यांचा विमान अपघातात मृत्यू (संशयास्पद)
विनायक दामोदर सावरकर यांचे
आत्मार्पण (आत्महत्या)
साल 1975
1975= 1+9+7+5=22
शेख मुजीबूर रहमान (बांगला
देशचे संस्थापक आणि पहिले पंतप्रधान) यांचा खून
साल 1984
1984= 1+9+8+4=22
पंतप्रधान इंदिरा गांधी
यांचा खून
खलिस्तानवादी अतिरेकी जर्नेल
सिंग भिंद्रनवाले याचा सैनिक कारवाईमध्ये मृत्यू
याच वर्षी दिल्ली आणि उत्तर
भारतात शीखांचे मोठे हत्याकांड झाले ज्यात हजारो शीख मारले गेले.
साल 1993
1993=1+9+9+3=22
मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगली
याचा अर्थ इतर साली महत्वाच्या लोकांचे अनैसर्गिक मृत्यू
झालेच नाहीत असा नाही. पण ज्या सालांमधील अंकांची बेरीज 22 येते अशा साली झालेल्या
अनैसर्गिक मृत्यूंची, विशेषत महत्वाच्या लोकांची संख्या जास्त आहे. ही संख्या प्रॉबेब्लीटीचा
नियम धुडकावून लावते.
विशेष म्हणजे या शतकात कोणत्याही सालाची बेरीज 22 येत नाही. तसेच पुढच्या शतकात देखील फक्त शेवटच्या वर्षी म्हणजे 2200 या वर्षीच 22 हा अंक दिसतो, तर 2299 या सालातल्या अंकंची बेरीज 22 येते. याउलट विसाव्या शतकात 22 बेरीज येणारी एकूण 7 वर्षे होती, ती म्हणजे 1939, 1948,
1957, 1966, 1975, 1984, 1993. यातील 1957 चा अपवाद वगळता या सर्व वर्षात महत्वाच्या व्यक्तिंचे अनैसर्गिक मृत्यू, किंवा मोठ्या दंगली वगैरे झालेले दिसतात.
हेही वाचा:
No comments:
Post a Comment