Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 2 March 2016

जन्मांक, भाग्यांक, नामांक .....

-महावीर सांगलीकर 
8149703595


अंकशास्त्रात निष्कर्ष काढायच्या आधी संबधीत व्यक्तिच्या केवळ जन्मांकाचा विचार करून उपयोग नाही. जन्मांकाबरोबरच भाग्यांकाचा आणि नामांकाचा विचार करणे तेवढेच महत्वाचे असते. या शिवायही इतर अनेक अंकाचा विचार केल्यास त्या व्यक्तिचे आपल्याला पूर्ण आकलन होऊ शकते.

पुढे मी कोण-कोणत्या अंकांचा विचार करायचा त्याची यादी देत आहे:

जन्मांक: व्यक्ति ज्या तारखेस जन्मली त्या तारखेतील अंकांची एक अंकी बेरीज. उदा. एखादी व्यक्ति 15 तारखेस जन्मली असेल तर 1+5=6.  28 तारखेस जन्मली असेल तर 28=2+8=10=1+0=1
भाग्यांक: पूर्ण जन्म तारखेतील अंकाची बेरीज. उदा. 25.12.1985= (2+5) + (1+2) + (1+9+8+6) = 7+3+24=34=3+4=7

नामांक: नावातील अक्षरांच्या अंकातील किमतीची एक अंकी बेरीज

वरील तीन अंक हे जास्त महत्वाचे आहेत. याशिवाय पुढील गोष्टींचाही विचार करावा लागतो:

मासांक: ज्या महिन्यात जन्म झाला त्या महिन्याचा अंक. उदा. फेब्रुवारी=2, डिसेंबर=12=1+2=3
वर्षांक: ज्या वर्षी जन्म झाला त्या वर्षातील अंकाची बेरीज. उदा. 1981 = 1+9+8+1=19=1+9=10=1+0=1
विशेष अंक: त्या व्यक्तिच्या चार्टमध्ये 11, 13, 17, 22, 26, 29, 31 यापैकी एखादा नंबर येत असल्यास.

नावातील प्रत्येक अक्षराची अंकातली किंमत, कोणता अंक अनेकदा आला आहे, कोणता अंक गायब आहे.
पूर्ण चार्टमध्ये कोणता अंक अनेकदा आला आहे आणि कोणता अंक गायब आहे.

या सर्व गोष्टींचा विचार केल्यास आपल्याला त्या व्यक्तिचे अचूक वाचना करता येते आणि त्यानुसार तिला योग्य मार्ग दर्शनकरता येते.

हेही वाचा: 
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा! 
तुमच्या सहीत दडलंय तुमचे व्यक्तिमत्व
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख