Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 9 January 2017

जन्मांक/भाग्यांक 5 आणि द्वेषाचे राजकारण

-महावीर सांगलीकर
मोबाईल फोन: 8149703595कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंमध्ये, तसेच ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेची एक अंकी बेरीज  5 येते, त्यांच्यात समूहांचे मेंदू ताब्यात घेण्याची कला कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. (म्हणजेच ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 5 आहे अशा व्यक्ती).  जन्मांक असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू, सुभाष चंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, डोनाल्ड ट्रम्प, संजय गांधी, राज ठाकरे वगैरे. भाग्यांक 5 असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे अडॉल्फ हिटलर, बॅरीस्टर मोहंमद अली जिना, नरेंद्र मोदी. या सगळ्यांनी समूहमने ताब्यात घेतली हे दिसून येते. हे सगळे चांगले वक्ते, प्रोपागांडा करणारे हा 5 या अंकाचाच प्रभाव. याशिवाय त्यांचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे अपवाद वगळता यातले बहुतेक सगळे कुठल्या तरी समूहाचा द्वेष करणारे आणि या द्वेषावर आधारित राजकारण करणारे ! 

डोनाल्ड ट्रम्प, राज ठाकरे आणि अकबरुद्दीन ओवेसी या तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या व्यक्ति. पण यांच्यातलं साम्य म्हणजे हे तिघंही विवादास्पद वक्तव्य देण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. हे तिघंही एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करणारं राजकारण करतात. विशेष म्हणजे या तिघांचीही जन्मतारीख 14 जून आहे!  यातला जून हा महिना फारसा महत्वाचा नाही. 

अंकशास्त्रानुसार 14 म्हणजे 5. (1+4=5). वर उल्लेख केलेल्या तीनही व्यक्तिंचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे राज ठाकरे ज्या मुंबईहून सूत्रे हलवतात, त्या मुंबईचा नामांक 5 आहे, (MUMBAI= 4+3+4+2+1+9= 23 =2+3 =5), तर अकबरुद्दीन ओवेसी ज्या हैद्राबाद इथून राजकारण करतात त्या हैदराबादचा नामांकही 5 आहे. (HYDERABAD= 8+7+4+5+9+1+2+1+4 = 41 =4+1=5 ). डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क इथं रहातात आणि न्यूयॉर्कचा नामांक 3 असला तरी त्यातल्या NEW या शब्दात  5 हा अंक 3 वेळा आला आहे आणि हेट पॉलिटिक्सच्या जोरावर ते ज्या अमेरिकेचे अध्यक्ष बनले आहेत त्या अमेरिकेचा नामांकही 5 आहे. (USA = 3+1+1 =5, AMERICA = 1+4+5+9+3+1= 32= 3+2 =5).

पण इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जन्मांक किंवा भाग्यांक 5  असणारे सगळेच राजकारणी कांही द्वेषाचं राजकारण खेळत नाहीत. तरीदेखील 5 हा अंक संबधीत व्यक्तीला तसं करायला लावण्याची शक्यता जास्त असते. हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख