-महावीर सांगलीकर
8149703595
भारताला 15 ऑगस्ट रोजी स्वांतंत्र्य मिळालं, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेनं घटनेचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. या तीनही तारखांच्यामध्ये आश्चर्यकारक अंकशास्त्रीय संबंध आहे.
26.11.1949 या तारखेतील अंकांची पूर्ण बेरीज 33
33=3+3=6
26.01.1950 या तारखेतील अंकांची पूर्ण बेरीज 24
24=2+4=6
15 ऑगस्ट
15=1+5=6
26 जानेवारी
26=2+6=8
15.8.1947 या तारखेतील अंकांची पूर्ण बेरीज 35
3+5=8
26=2+6=8
म्हणजे 15.8.1947, 26.11.1949 आणि 26.01.1950 या तीनही तारखांमध्ये 6 आणि 8 हे अंक उलटे-सुलटे आले आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासावर 6 आणि 8 या अंकांचा मोठा प्रभाव पडला आहे. 6 हा अंक एकीकडं भारताला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जातो, विविधतेमध्ये एकता आणतो तर 8 हा अंक (विशेषत: तो 26 असल्यानं) आर्थिक समृद्धी, सत्ता या बरोबरच कलह, संकटं आणतो. भारतानं स्वातंत्र्यानंतर प्रचंड आर्थिक आणि इतर प्रगती केली आहे, भारतीय उपखंडात तो 'दादा' बनला आहे पण त्याच बरोबर हा देश युद्धे, दहशतवाद आणि अंतर्गत कलहाने ग्रस्त राहिला आहे.
26 हा अंक आपत्तीचा नंबर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे 26 तारखेला घटना स्वीकारणं आणि लागू करणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या होत्या. त्याचा मोठा फटका भारताला वेळोवेळी बसला आहे. त्याविषयीची माहिती मी ‘आपत्तीचा नंबर 26’ या लेखात दिली आहे.
हेही वाचा:
आपत्तीचा नंबर 26
1948, 1966, 1975, 1993, 1984
जन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26
जन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24
अंकशास्त्र आणि मुहुर्त
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
No comments:
Post a Comment