-महावीर सांगलीकर
8149703595
अनेक कुटुंबांमध्ये कांहीतरी कौटुंबिक समस्या असतात. नवरा-बायकोची भांडणं, सासू-सुनांची भांडणं, बायकोनं कायमचे माहेरी निघून जाणं, घटस्फोट, बाप-मुलाची भांडणं, भावा-भावाची भांडणं, संवादाचा अभाव वगैरे. ज्यांची नेहमी आणि टोकाची भांडणं होतात त्यांच्या जन्मतारखा बघितल्यास असं दिसतं की त्यांचे जन्मांक एकमेकांना अनुकूल नसतात. तसेच कांही विशिष्ट जन्मांक असणाऱ्यांचं कुणाशीच पटत नसतं. समस्या असणाऱ्या बहुतेक कुटुंबामध्ये एकतरी व्यक्ति असे विशिष्ट जन्मांक असणारी असते.
प्रत्येक व्यक्तिचा जुळवून घेण्याचा किंवा न घेण्याचा स्वभाव तिच्या जन्मांकानुसार ठरलेला असतो. त्यात बदल करणे ही फार अवघड गोष्ट असते. पण कांही अंकशास्त्रीय ट्रिक्स वापरून ‘जुळवून न घेण्याच्या ’ स्वभावात कमी काळात बऱ्यापैकी बदल करता येतो. यासाठी विशिष्ट अंकाचा, तारखांचा त्या-त्या व्यक्तिच्या लकी नंबर्सचा, रंगांचा वापर करण्याचा तसेच कांही अंक, तारखा आणि रंग टाळण्याचा सल्ला दिला जातो. कांही वेळा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जातो. समुपदेशन केले जाते. या उपायांच्यामुळं कौटुंबिक समस्या सुटत असल्याचं दिसून येतं.
हेही वाचा:
अंकशास्त्र म्हणजे काय?
जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?
अंक आणि करीअर
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
No comments:
Post a Comment