Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 8 June 2015

अंकशास्त्र: मोदींची माणसं

महावीर सांगलीकर
मोबाईल फोन: 814 970 3595


प्रत्येक व्यक्तिचे खास मित्र, विश्वासू व्यक्ति, जवळचे सहकारी हे त्या व्यक्तिच्या जन्मतारखेस अनुकूल अशा जन्मतारखांना जन्मलेले असतात. मित्रांची, सहका-यांची ही निवड आपोआपच होत असते, कारण अशी निवड करतांना त्यांच्या जन्मतारखा पाहिल्या जात नसतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख 17.09.1950 ही आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 8 आहे तर भाग्यांक 5 आहे. त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र नंबर 4 हा आहे. आता नियमाप्रमाणे मोदींची जवळची माणसे 8, 5 अथवा 4 यापैकी एखादा जन्मांक अथवा भाग्यांक असणारी पाहिजेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास माणसांचे जन्मांक अथवा भाग्यांक काय आहेत हे आपण पाहुया:

केंद्रातले जवळचे सहकारी
इथे मी केवळ महत्वाच्या सहका-यांचाच विचार केला आहे. असे दिसून येते की कांही अपवाद वगळता बहुतेकांचे जन्मांक/भाग्यांक 4, 5 किंवा 8 आहेत:
  
अमित शहा: जन्मांक 4
नजमा हेपतुल्ला: जन्मांक 4
अनंत कुमार: जन्मांक 4 
मनोहर पर्रीकर: जन्मांक 4
व्यंकय्या नायडू: भाग्यांक 4
सुषमा स्वराज: जन्मांक 5
स्मृति इराणी: जन्मांक 5
कलराज मिश्र: भाग्यांक 5
रामविलास पासवान: भाग्यांक 5
उमा भारती: भाग्यांक 5
मनेका गांधी: जन्मांक 8  

राज्यांचे मुख्यमंत्री
भारताच्या 8 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यापैकी 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे जन्मांक/भाग्यांक 4, 5 किंवा 8 आहेत.

देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र): जन्मांक 4
लक्ष्मीकांत पर्सेकर (गोवा): जन्मांक 4
मनोहर लाल खत्तर (हरियाणा): जन्मांक 5
शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश): भाग्यांक 5
वसुंधरा राजे (राजस्थान): जन्मांक 8

मोदींच्या जवळच्या सहका-यांमधील बहुतेकांचे जन्मांक/भाग्यांक  विशिष्ट असणे ही गोष्ट अंकशास्त्राचा हा नियम सिद्ध करून दाखवते.

हेही वाचा:
उर्जित पटेल यांची आत्मघातकी सही
अंकशास्त्र: इंदिरा गांधी
अंकशास्त्र: नरेंद्र मोदी
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख