Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 16 May 2016

व्हिज्युअलायझेशन टेक्निक: तुम्हाला जे हवंय, ते सहज मिळवा!

-महावीर सांगलीकर 
Numerologist & Motivator, Pune
914 531 8228

तीन महिन्यांपूर्वी माझं वजन 60 किलो होतं. मला माझं वजन वाढवायचं होतं. साधारण 10-12 किलोनं. वजन वाढण्यासाठी मी कांही विशेष प्रयत्न केले नाहीत. तरीही केवळ 3 महिन्यात माझं  वजन दहा किलोनं वाढलं. आता ते 70 किलो झालं आहे. हे कसं शक्य झालं? तर त्यासाठी मी व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरलं. मी कांही दिवस स्वत:लाच सांगत राहिलो की माझं वजन वाढत आहे. त्याचबरोबर माझं वजन खरंच वाढत आहे अशी कल्पना करत राहिलो. ते वाढत असल्याचे मनोमन पाहिले. त्याचाच परिणाम म्हणजे माझं वजन 10 किलोनं वाढलं.

असं होणं कसं शक्य आहे? विश्वास नाही बसत? तुम्हीही हा प्रयोग करू शकता. केवळ वजन वाढवण्यासाठीच नाही तर कमी करण्यासाठी सुद्धा. त्यासाठी तुम्हाला इतर महागडे उपाय, वेगळा व्यायाम  करण्याची गरज नाही. तुम्ही जेंव्हा तुमचं वजन वाढण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी तुमच्या मनाला सूचना देता, त्याचं व्हिज्युअलायझेशन करता तेंव्हा तुमच्या आहारात, शारीरिक हालचालीत आपोआपच बदल घडतात. त्यानुसार तुमचं वजन कमी किंवा जास्त होतं.

व्हिज्युअलायझेशन टेक्निक इतर अनेक गोष्टींसाठी सुद्धा वापरता येतं आणि तुम्हाला त्याचे आश्चर्यकारक रिझल्ट्स मिळू शकतात. तुमचे बरे न होणारे अनेक आजार बरे होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जीवनात जे पाहिजे ते मिळू शकतं. ते किती लवकर मिळेल हे तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे यावर अवलंबून आहे. मुळात हे टेक्निक वापरून तुम्हाला जे हवंय ते मिळवता येते यावर तुमचा गाढ विश्वास असणे आणि कोणतीही शंका-कुशंका न बाळगता ते वापरण्याची इच्छा असणं हे महत्वाचे आहे.

हेही वाचा:
तुमच्या सहीत दडलंय तुमचे व्यक्तिमत्व
स्वप्ने आणि त्यांचे गूढ अर्थ
अंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख