Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 18 April 2016

स्वप्ने आणि त्यांचे गूढ अर्थ

-महावीर सांगलीकर 
9145318228

माझ्या एका मित्राला स्वप्नात दिसले की तो मरून पडला आहे. वरवर बघितले तर हे एक भीतीदायक स्वप्न वाटते. पण प्रत्यक्षात या स्वप्नाचा अर्थ खूप चांगला आहे. असे स्वप्न पडणाऱ्या व्यक्तिला  लवकरच एखाद्या विषयात तज्ञ असलेल्या किंवा एखाद्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी असलेल्या माणसाबरोबर काम करण्याची संधी मिळणार असते. असे स्वप्न पडणारी व्यक्ति लवकरच प्रचंड श्रीमंत होणार असते आणि फार काळ जगणार असते.

बहुतेक सगळ्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नात जे दिसते त्याच्यापेक्षा वेगळा आणि बऱ्याचदा उलटा असतो. त्यामुळे तुम्हाला एखादे भीतीदायक स्वप्न पडले तर त्यामुळे तुम्ही घाबरून जायचे कारण नाही.

‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ हे म्हणणे फारसे खरे नाही. बहुतेक वेळा तुमच्या मनात नसलेल्या गोष्टी स्वप्नात दिसत असतात. याउलट दिवसभर तुम्ही जो विचार करत असता त्यानुसार तुम्हाला स्वप्न पडेलच असे नाही. पण दुसरी एखादी व्यक्ति तुमच्याबद्दल चांगला अथवा वाईट विचार करत असेल तर तुम्हाला त्यानुसार स्वप्न पडण्याची शक्यता असते.

तुम्हाला पडणारी स्वप्ने तुमच्यासाठी पूर्वसूचना देत असतात. पण नेमकी काय पूर्वसूचना आहे याचा नेमका अर्थ लावावा लागतो. वरवर लावलेला अर्थ हा चुकीचा असतो.

तुम्हाला एखादे विचित्र आणि गूढ स्वप्न पडले असेल, किंवा एखादे स्वप्न सारखे सारखे पडत असेल, तर तुम्ही मला 9145318228 या नंबरवर अवश्य कळवावे. ते स्वप्न तुम्हाला नेमके काय सांगते हे मी तुम्हाला सांगू शकेन –महावीर सांगलीकर

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख