Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 22 November 2015

राहुल गांधी

-महावीर सांगलीकर 
8149703595


अनेक लोक, ज्यांना राहुल गांधी यांची नीट माहिती नाही आणि जे मेडिया व राहुल-विरोधकांचे ऐकून राहुल गांधी यांच्या विषयी आपले मत बनवतात, ते मोठी चूक करत आहेत. पण राहुल गांधी यांच्या जन्मतारखेवरून सांगता येते की त्यांच्याकडे अनेक गुण आहेत आणि आणि नजिकच्या भविष्यात त्यांना मोठ्या संध्या मिळणार आहेत. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता दाखवली आहे.

राहुल गांधी यांची जन्म तारीख 19 जून 1970 आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 1 येतो तर भाग्यांक 6 येतो. त्यांचा नामांक 4 येतो.

जन्मांक:

19=1+9=10=1+0=1
अंकशास्त्रात हा अंक 1 ते 9 या अंकांमध्ये सर्वात चांगला मानला गेला आहे. हा जन्मांक असणारे लोक उपजतपणे नेतृत्व गुण असणारे, लढाऊ, पुढाकार घेणारे, उमद्या व्यक्तिमत्वाचे असतात. (विशेष म्हणजे राहुल गांधी यांची आज्जी इंदिरा गांधी यांची जन्मतारीखही 19 होती).

भाग्यांक:

19.6.1970= (1+9)+ (6) + (1+9+7+0)= 10+6+17=33=3+3=6
(त्यांच्या RAHUL या नावाचा नामांक ही 6 येतो.)
6 भाग्यांक  असणाऱ्या व्यक्तिंना प्रचंड आत्मविश्वास असतो. या व्यक्ति मानवतावादी आणि इतरांची काळजी घेणाऱ्या असतात.

त्यांच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज 33 येते.  33 हा एक मास्टर नंबर आहे आणि तो त्यांना भावनाशील बनवतो.

नामांक:

R A H U L
9 1 8 3 3 बेरीज 24
G A N D H I
7 1 5 4 8 9 बेरीज 34
24+34= 58 =5+8 =13= 1+3= 4

हा नामांक तर्कनिष्ठ विचार आणि स्पष्टवक्तेपणा यांच्याशी संबधीत आहे.

राहुल गांधी यांचे अंक राजकारण क्षेत्रात काम करण्यासाठी योग्यच आहेत. पण त्यांनी राजकारणाऐवजी  अभिनय क्षेत्रात काम केले असते तर त्यांना बॉलीवूडमध्ये हिरो म्हणून प्रचंड यश मिळाले असते, किंवा त्यांनी उद्योग क्षेत्रात काम केले असते तर ते मोठे आणि यशस्वी उद्योगपति झाले असते. !

हेही वाचा:
इंदिरा गांधी
नरेंद्र मोदी
शरद पवार
देवेंद्र फडणवीस
अजित दादा पवार

No comments:

Post a Comment

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख