महावीर सांगलीकर
9145318228
यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातली दोन मोठी नावे. शरद पवार हे यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. या दोघांच्यात आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते. विशेष म्हणजे या दोघांचेही जन्मांक आणि भाग्यांक सारखेच आहेत! इतकेच नाही तर दोघांचाही वर्षांक आणि मासांक (Month Number) देखील सारखाच आहे!
यशवंतराव चव्हाण
जन्मतारीख: 12.03.1913
जन्मांक 3 (12=1+2=3)
भाग्यांक 2 [12.03.1913 =(1+2) + (3) + (1+9+1+3) = 3+3+14 =20 =2+0=2]
वर्षांक: 5 (1913 = 1+9+1+3= 20= 2+0=2)
मासांक: मार्च= 3
शरद पवार
जन्मतारीख: 12.12.1940
जन्मांक 3 (12=1+2=3)
भाग्यांक 2 [12.12.1940=(1+2) + (1+2) + (1+9+4+0) = 3+3+14 =20 =2+0=2]
वर्षांक: 5 (1940 = 1+9+4+0= 14= 1+4=5)
मासांक: डिसेंबर = 12=1+2=3
एवढे अंकशास्त्रीय साम्य असल्यावर दोघांच्या जीवनात आणि कार्यात देखील समान धागे असायला पाहिजेत. दोघांचीही चरित्रे वाचली तर असे साम्य दिसून येते. इथे मी एका मोठ्या साम्याचा उल्लेख करतो. ते म्हणजे हे दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. विशेष म्हणजे हे दोघेही ज्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्या तारखेताही साम्य आहे. यशवंतराव चव्हाण 1960 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर शरद पवार 1978 रोजी मुख्यमंत्री झाले. या दोन्ही वर्षातील अंकाची एक अंकी बेरीज 7 येते. पुढे त्यांनी केंद्रात प्रवेश केला, या दोघांनीही भारताचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले. केंद्रातली इतरही अनेक महत्वाची मंत्रीपदे भूषवली. पण ते दोघेही इच्छा असूनही पंतप्रधानपद मिळवू शकले नाहीत. या दोघांचेही सर्वोच्च नेत्यांशी वितुष्ट आले आणि त्यांना पक्ष सोडावा लागला. दोघांनीही अनेकदा पक्षांतर केले. अशी अनेक इतर साम्ये शोधता येतील. या साम्याचे मूळ त्यांचे अंक समान असणे हे आहे. तसेच त्यांच्या बाबतीत जे घडले त्याचे कारण त्यांच्या अंकांचे गुणदोष हेच आहे.
हेही वाचा:
शरद पवार
इंदिरा गांधी
बाळासाहेब ठाकरे
अजित दादा पवार
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
No comments:
Post a Comment