-महावीर सांगलीकर
8149703595
8149703595
आपल्या दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी गाडीसाठी कोणता नंबर असावा? याचे कांही सोपे नियम आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे असे आपण निवडत असलेला नंबर शक्यतो चढता नंबर असावा, तो उतरता असू नये. जसे 1234 हा चढता नंबर आहे, तर 4321 हा उतरता नंबर आहे.(पण तसे पाहिजेच असे नाही).
दुसरे म्हणजे आपण निवडणार असलेल्या नंबरमधील आकड्यांची एक अंकी बेरीज त्यांचा जन्मांक आणि भाग्यांक या दोन्हीला सुसंगत (Compatible) असायला पाहिजे. जसे, समजा तुमची जन्मतारीख 10.5.1990 आहे. येथे तुमचा जन्मांक 1 आहे तर भाग्यांक (पूर्ण तारखेतील अंकांची एक अंकी बेरीज) 7 आहे. आता तुम्ही ज्यातील अंकांची बेरीज 1 किंवा 7 आहे असा कोणताही शक्यतो चढता नंबर तुमच्या गाडीसाठी निवडू शकता. जन्मांक व भाग्यांक यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी अंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन हा लेख वाचावा.
वरील उदाहरणात 1 व 7 हे दोन्ही अंक सुसंगत असल्याने दोन्हीपैकी एखादी बेरीज येणारा नंबर निवडला तर चालतो. पण जन्मांक आणि भाग्यांक हे एकमेकांशी विसंगत असल्यास तसे चालत नाही. अशावेळी तुम्ही वरील पद्धतीने निवडलेला नंबर जन्मांक आणि भाग्यांक या पैकी एकाला विसंगत असतो. जन्मांक आणि भाग्यांक या दोन्हींना सुसंगत असणारा नंबरच परफेक्ट लकी नंबर ठरतो.
तुमचा जन्मांक आणि भाग्यांक हे दोन्ही पुढीलपैकी एखाद्या ग्रुप मधले असले तर वर सांगितलेली मेथड तुम्ही वापरू शकता:
1, 5, 7
2, 4, 8
3, 6, 9
(उदा. तुमचा जन्मांक 1 आहे आणि भाग्यांक 5 आहे, किंवा तुमचा जन्मांक 4 आहे आणि भाग्यांक 2 आहे वगैरे).
विसंगत जन्मांक-भाग्यांक:
1: 2, 4, 6
2: 1, 5, 7
3: 4, 7, 8
4: 1, 3, 9
5: 2, 6
6: 1, 5, 7
7: 2, 3, 6, 8, 9
8: 3, 7, 9
9: 4, 7, 8
तुमचा जन्मांक आणि भाग्यांक वेगवेगळ्या ग्रुपमधले असतील आणि ते एकमेकांशी विसंगत असतील तर सुरवातीला सांगितलेली मेथड वापरू नये. विसंगत जन्मांक-भाग्यांकाच्या बाबतीत लकी नंबर निवडायला खूप खोलवर विचार करावा लागतो. अशावेळी तुम्ही मॉडर्न न्यूमरॉलॉजीचे प्रगत ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडून सल्ला घेतला पाहिजे. एखादा लकी नंबर कार्मिक डेब्ट नंबर असेल (13, 14, 16, 19 पैकी एखादा किंवा एवढी बेरीज येणारा) तर तो लकी वाटत असूनही त्रासदायक ठरू शकतो.
हेही वाचा:
No comments:
Post a Comment