-महावीर सांगलीकर
एक वर्षापूर्वी मला औरंगाबादवरून एक विद्यार्थ्याचा फोन आला होता. त्याला म्हणे डॉक्टरनं सांगितलं होतं, की त्याला एक गंभीर आजार आहे आणि तो फारतर सहा महिने जगेल. त्यानं मला असं सांगताच मी म्हणालो, हे बघ, कोणताही शहाणा डॉक्टर तुला असं सांगणार नाही, सांगितलंच तर तुझ्या पालकांना सांगेल. तरीपण त्या डॉक्टरनं डायरेक्ट तुला तसं सांगितलंच असेल तर त्या डॉक्टरचे हेतू कांही चांगले दिसत नाहीत.
तो विद्यार्थी खोटं बोलत असावा अशी मला त्याचवेळी शंका आली होती.
परवा मला त्या विद्यार्थ्याचा परत फोन आला. तो परत तेच रडगाणं गाऊ लागला. तो अजून फार काळ जगणार नाही वगैरे. मी त्याला म्हणालो, ‘पण तू तर सहा महिन्यापूर्वीच मरणार होतास म्हणे. अजून कसा काय जिवंत आहेस? तू पुढच्या वर्षी देखील मला फोन करणार आहेस’
‘डॉक्टरनं जगवलं... गोळ्या आणि इंजेक्शने देऊन’
या घटनेवरून कळतं कि एकतर तो विद्यार्थी खोटारडा आहे, किंवा तो डॉक्टर बदमाश आहे.
एक वर्षापूर्वी मी त्या विद्यार्थ्याला ‘यू कॅन हील युवर लाईफ’ हे लुईस हे या लेखिकेचं पुस्तक त्यानं दिलेल्या पत्त्यावर कुरिअरनं माझ्याकडून गिफ्ट म्हणून पाठवलं होतं. ते वाचल्यानं कदाचित त्याच्या मानसिकतेत फरक पडेल म्हणून. पण ते कुरिअर परत आलं. कारण घर बंद आहे म्हणून. (लॉ ऑफ अॅट्रॅक्शनच्या नियमानुसार निराश, निगेटिव्ह व्यक्तिपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचत नाहीत, त्याचं हे एक उदाहरण). पण त्यानं मला सांगितलं होतं, तो घरीच असतो, त्याला कांही हालचाल करता येत नाही वगैरे.
परवा त्याचा फोन आला तेंव्हा तो मला म्हणतो, तुम्ही मला पुस्तक पाठवलंच नाही म्हणून!
माझा त्या विद्यार्थ्यावर राग वगैरे नाही. कदाचित असं असू शकतं की त्याच्या घरचे लोक त्याच्याकडं नीट लक्ष देत नसावेत, तो अतिशय निराश वगैरे झालेला असू शकतो. डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगितलं असावं की याला गंभीर आजार आहे, आणि पालक त्याला ते सतत बोलून दाखवत असावेत. किंवा तो तरुण अशा मानसिक अवस्थेत असू शकतो की त्याने आपल्याला गंभीर आजार आहे आणि आपण मरणार आहोत अशी कल्पना करून घेतली असावी.
मी तरी आणखी काय करू शकणार? त्या विद्यार्थ्याला, तसेच संकटात असणाऱ्या इतरांना मदत करण्याची माझी नेहमीच इच्छा असते, पण त्यांच्याकडून थोडा तरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यावा, फॉलो अप ठेवला जावा एवढीच माझी इच्छा असते.
हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
No comments:
Post a Comment