Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 14 April 2017

माझे रहस्यमय प्रयोग (2) : जन्मांक 8 शी मैत्रीचा प्रयोग

-महावीर सांगलीकर 
Numerologist & Motivator
8149703595 

अंकशास्त्रात 8 हा अंक धन, संपत्ती आणि सत्ता यांच्याशी संबधित आहे. ज्यांच्या चार्टमध्ये हा अंक जन्मांक, भाग्यांक किंवा नामांक म्हणून आलेला असतो, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर धन आणि संपत्ती येण्याची शक्यता असते. पण मग तुमच्या चार्टमध्ये 8 हा अंक नसेल तर? त्याचं उत्तर असं आहे की जन्मांक, भाग्यांक, नामांक कांहीही असला तरी तुमच्या कष्टाने आणि बुद्धीने पैसा, संपत्ती मिळवू शकणारच असता. पण 8 या अंकामुळे तुमच्याकडे जेवढे धन, जेवढी संपत्ती येऊ शकली असती तेवढी येणार नाही.

पारंपारिक अंकशास्त्री, ज्योतिषी यावर एक उपाय सांगतात. तो म्हणजे तुम्ही एका कागदावर 8 हा अंक लिहा आणि तो कागद तुमच्या खिशात ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे धन आणि संपत्ती आकर्षित होईल.

पण मी नेहमीच वेगळे आणि प्रयोग करणारा माणूस. मी विचार केला, असं कागदावर 8 हा अंक लिहून तो कागद खिशात ठेवण्यापेक्षा आपण ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 8 आहे अशा व्यक्तींशी मैत्री केली तर? मला हा प्रयोग महत्वाचा वाटला म्हणून मी तो लगेच करून बघायचं ठरवलं. हे 8 नंबरवाले मित्र मिळवायचे कोठून हा कांही माझ्यासाठी फार मोठा प्रश्न नव्हता. मला असे मित्र मिळावेत असं मनात आणलं आणि तसे मित्र मिळत गेले. कोणी क्लाएंट  म्हणून आलं, तर कुणाची सहजासहजी ओळख झाली. मी त्यांच्याशी मैत्री केली. मग ते माझे खास मित्र झाले.

या प्रयोगाचा दुसरा भाग म्हणजे मैत्री पक्की करण्यासाठी मी त्यांच्या सतत टच मध्ये राहू लागलो. सोशल मिडियातनं, फोनवर आणि प्रत्यक्षात. अधूनमधून त्यांना जेवायला नेलं, पुस्तकं गिफ्ट दिली.
या प्रयोगाचा परिणाम असा झाला की माझ्याकडे पैशाचा प्रवाह कधी नव्हे तेवढा वाढला. म्हणजे या 8 नंबर असणाऱ्या मित्रांकडून मला डायरेक्ट कांहीच मिळालं नाही, पण माझी अंकशास्त्राची प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात वाढली.

तुम्हीही हा प्रयोग करून बघू शकता. पण हा प्रयोग सरसकट सगळ्यांना लागू पडत नाही. ज्यांचा जन्मांक 2 किंवा 4 आहे त्यांना या प्रयोगात चांगले यश मिळू शकतं. तसेच जन्मांक 1 किंवा 6 असणाऱ्यांनादेखील या प्रयोगाचा फायदा होऊ शकतो. 8 जन्मांक  किंवा भाग्यांक असणाऱ्यांनी हा प्रयोग करण्याची गरजच नाही. इतरांनी (म्हणजे जन्मांक 3, 5, 7, 9 असणाऱ्यांनी) हा प्रयोग न केलेला बरे. या प्रयोगातला धोका म्हणजे तुम्हाला या 8 नंबरच्या मित्रांमुळे मोठा मनस्ताप होऊ शकतो. भांडणे होऊ शकतात. पण ती तुम्ही टाळली, त्यांच्या कलाने घेतलं तर तुमचा फायदाच फायदा होईल.

हेही वाचा:

अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन


No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख