Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 24 April 2017

माझे रहस्यमय प्रयोग: बाळाचा जन्म आणि अंकशास्त्र

-महावीर सांगलीकर 
8149703595

वयाची तिशी ओलांडून गेलेल्या नीताचं अजून लग्न झालं नव्हतं. ती कुणाला पसंत पडेल एवढी सुंदर नव्हती. शिकलेली होती, पण जॉब नव्हता. मी तिला कांही सल्ले दिले. कांही पुस्तकं वाचायला सांगितली, कांही व्हिडीओज बघायला सांगितले. ही पुस्तकं आणि व्हिडीओज लॉ ऑफ अॅट्रॅक्शन, पॉझिटिव्ह थिंकिंग, व्हिज्युअलायझेशन, प्रेयर्स अशा विषयावरची होती. त्यानंतर दोनच महिन्यात तिला एक चांगला जॉब मिळाला. पुढे सहा महिन्यातच तिचं लग्न सहजासहजी झालं!

ती मला अधून-मधून फोन करत असे. लग्नानंतर कांही महिन्यातच ती प्रेग्नंट झाली. तिला नॅचरल डिलिव्हरी पाहिजे होती, सिझेरिअन करायचं नव्हतं. डॉक्टरांनी तिला 26 ऑक्टोबर 2015 ही तारीख दिली होती. तिनं मला हे सांगितलं. मुलाचा जन्म या तारखेला होणं अंकशास्त्रानुसार त्याच्या भविष्याच्या दृष्टीनं चांगलं नव्हतं. मी नीताला यातले धोके सांगितले. या तारखेला बाळाचा जन्म झाल्यास त्याचा जन्मांक 8 (त्यातही 26 तारीख), वर्षांक 8 आणि भाग्यांकही 8 असणार होता. 8 या अंकाचं असं रिपिटेशन आणि जन्मांक-भाग्यांकाचं 8-8 हे कॉम्बीनेशन अतिशय घातक ठरलं असतं. 26 तारखेच्या जवळची 24 ही तारीख खूपच चांगली आहे हे माझ्या लक्षात आलं. मी नीताला सांगितलं, ‘हे बघ बाळाचा जन्म 24 तारखेलाच व्हायला पाहिजे. 24 तारखेला जन्म झाल्यास त्याचा जन्मांक 8 आणि भाग्यांक 6 होईल. हे 8-6 कॉम्बिनेशन त्या बाळाला आयुष्यात यशस्वी, जबाबदार आणि सुखी व्यक्ती बनवेल. तू तुझी नॅचरल डिलिव्हरी दोन दिवस अगोदर होईल असे बघ. त्यासाठी काय करायला पाहिजे ते तुला माहीतच आहे’.

नीतानं मी तिला तिचं लग्न होण्यासाठी सांगितलेल्या ट्रिक्स बाळाच्या जन्मासाठी वापरल्या. इकडे मीही बाळाचा जन्म 24 तारखेला व्हावा अशी मनोमन प्रार्थना केली. मग बाळाचा जन्म 24 तारखेलाच झाला. हा प्रयोग यशस्वी झाला याचे मला आश्चर्य मात्र वाटले नाही. कारण यात विशेष कांही नव्हतं!  

हेही वाचा:
माझे रहस्यमय प्रयोग (2) : जन्मांक 8 शी मैत्रीचा प्रयोग

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख