महावीर सांगलीकर
Numerologist & Graphologist
Telegram हे Whats app सारखं एक मेसेजिंग app आहे. पण Telegram हे अनेक बाबतीत Whats app पेक्षा खूप सरस आहे!
तुम्ही जर एखादे व्यावसायिक असाल, किंवा तुमचे खूप कॉन्टॅक्टस असतील आणि एकच मेसेज तुम्हाला एकाचवेळी खूप लोकांना पाठवावा लागत असेल तर तुमच्यासाठी Telegram खूप उपयोगी पडतं. त्यासाठी तुम्हाला Telegram वर एक चॅनेल तयार करावं लागेल. या चॅनेल मध्ये सुरवातीला तुम्ही तुमचे 200 कॉन्टॅक्टस ऍड करू शकाल, नंतर चॅनेलच्या लिंक द्वारे अमर्यादित लोक हे चॅनेल सबस्क्राइब करू शकतील. म्हणजे हजारो, लाखो किंवा अगदी करोडो देखील! चॅनेलच्या सहाय्याने तुम्ही या सर्वांना एकाच वेळी मेसेज, इमेज, व्हिडीओ वगैरे पाठवू शकता.
Whats app वर हीच सोय ब्रॉड कास्टिंग लिस्ट बनवून करता येते, पण तिथं तुम्ही या लिस्टमध्ये केवळ 256 लोकांना ऍड करू शकता.
Telegram आणखी एक मोठं वैशिष्ठय हे आहे कि इथं तुम्ही ग्रुप्स बनवू शकता व प्रत्येक ग्रुपमध्ये हजारो लोकांना ऍड करू शकता.
Whats App वर तुम्ही ग्रुप्स किंवा ब्रॉडकास्टिंग लिस्ट सर्च करू शकत नाही पण Telegram वर तुम्ही तुम्हाला हव्या त्या विषयाचे ग्रुप्स व चॅनेल्स शोधू शकता व त्यांना सबस्क्राईब करू शकता.
महत्वाचं म्हणजे Whats app वर टाईम पासर्स आणि फॉरवर्ड बहाद्दर्स यांची संख्या मोठी आहे, याउलट Telegram वर 'सिरिअस किस्म के लोग' जास्त संख्येने आहेत.
Telegram app तुम्ही तुमच्या डेस्क टॉप वरून देखील ऑपरेट करू शकता.
एकूणच तुम्हाला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला Whats app पेक्षा Telegram जास्त उपयोगी ठरते.
तुम्ही Telegram जॉईन केलं तर मला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये ऍड करू शकता. तसेच तुम्हाला न्यूमरॉलॉजी व ग्राफोलॉजी या विषयात रस असेल तर तुम्ही माझं या विषयावरचं चॅनेल सबस्क्राईब करू शकता. या चॅनेलची लिंक पुढे दिली आहे: https://t.me/mahaveersanglikar
हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
No comments:
Post a Comment