Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 6 March 2015

बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

-महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
 8149703595


बिझनेस न्यूमरॉलॉजी ही अंकशास्त्राची  एक महत्वाची शाखा आहे. बिझनेस न्यूमरॉलॉजी ही व्यावसायीकांना आणि उद्योजकांना अतिशय उपयोगी पडते. यामध्ये न्यूमरॉलॉजीस्ट तुम्हाला तुमची जन्मतारीख, तुमचे नाव, तुमच्या व्यवसायाचे नाव तसेच इतर अनेक नावांचा व तारखांचा विचार करून मार्गदर्शन करतो.

तुम्ही नवीन दुकान, व्यावसायिक सेवा, प्रोजेक्ट, कंपनी सुरू करताना त्यासाठी योग्य नाव निवडणे ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट असते. हे नाव तुमच्या व्यवसायाला योग्य असणे तर गरजेचे असतेच, पण त्याचबरोबर ते  न्यूमरॉलॉजीप्रमाणे परफेक्ट असावे लागते. असे परफेक्ट नाव तुमच्याकडे ग्राहक, क्लाएंट्स आणि इतरांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करते, तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कामे आणि ऑर्डर्स मिळतात, तुमच्या वस्तूंची जास्त विक्री होते, आणि तुमच्याकडे पैशांचा प्रवाह सुरू होतो.  

कदाचित तुम्हाला खोटे वाटेल, पण विश्वास ठेवा, तुमच्या बिझनेसचे नाव योग्य असणे ही गोष्ट तुम्ही त्या बिझनेसमध्ये किती पैसे गुंतवता, तुमच्याकडे किती चांगले लोक काम करतात, तुम्ही तुमच्या बिझनेसची किती जाहिरात करता यापेक्षा महत्वाची आहे. जगातील अनेक मोठ्या यशस्वी कंपन्याची नावे विचारपूर्वक ठेवलेली आहेत आणि ती ठेवताना न्यूमरॉलॉजीचा वापर केला गेला आहे. (किंवा जे उद्योजक खूप यशस्वी झालेले असतात, त्यांनी जरी  न्यूमरॉलॉजीचा वापर केलेला नसेल तरी त्या स्थितीत त्यांच्या उद्योगाचे नाव  न्यूमरॉलॉजीनुसार लकी असणारे दिसते).

पण बिझनेस न्यूमरॉलॉजी केवळ योग्य नाव ठरवण्यापुराती मर्यादित नाही. तिचा उपयोग इतर अनेक गोष्टींच्या मार्ग दर्शनासाठी करता येतो. उदा.
● तुमच्या जन्मतारखेनुसार कोणता व्यवसाय तुम्हाला जास्त लाभदायक ठरू शकतो?
● तुमच्या व्यवसायासाठी कोणते शहर तुम्हाला जास्त लाभदायक आहे?
● तुमच्या बिझनेससाठी तुम्ही निवडलेले नाव योग्य आहे का?
● तुमच्या प्रोडक्टसाठी कोणते नाव जास्त योग्य आहे?
● तुमच्या नव्या व्यवसायाची सुरवात कोणत्या दिवशी करणे तुम्हाला जास्त लाभदायक ठरेल?
● तुमचे नवे प्रोडक्ट कोणत्या दिवशी लॉन्च करणे तुम्हाला लाभदायक ठरेल?
● तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करत असाल कोणती व्यक्ति पार्टनरशिपसाठी जास्त योग्य ठरेल?
● तुमच्या बिझनेस हाउसमध्ये जबाबदारीच्यापदावर ज्या व्यक्तीस नेमत आहात ती व्यक्ति तुमच्यासाठी न्यूमरॉलॉजीकली योग्य आहे का?
● तुमच्या बिझनेसचा लोगो कसा असावा?
● तुमचं बिझनेस कार्ड, लेटरहेड यावर कोणती कलर स्कीम वापरावी?
● बिझनेसच्या लॅण्डलाईन व   मोबाईल फोनसाठी कोणते नंबर्स तुम्हाला  लकी ठरतील?
● तुमची सही योग्य आहे का?

याशिवाय बिझनेस न्यूमरॉलॉजीच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या चालू व्यवसायात येणाऱ्या आर्थिक आणि इतर अडचणींवर प्रभावी उपाय सुचवता येतात.

तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करत असाल, किंवा तुमच्या सध्याच्या व्यवसायात कांही अडचणी येत असतील तर न्यूमरॉलॉजीस्टचा सल्ला अवश्य घ्या.

हेही वाचा:

6 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. सुशिल महादेव मिरगल
    11/07/1982
    कोणता व्यवसाय सुरू करावा.
    कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  3. 2/7/1973
    कोणता व्यवसाय सुरू करावा

    ReplyDelete
  4. Very nice suggestion n guidelines

    ReplyDelete

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख