Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 22 November 2015

राहुल गांधी

-महावीर सांगलीकर 
Numerologist & Graphologist
8149703595


अनेक लोक, ज्यांना राहुल गांधी यांची नीट माहिती नाही आणि जे मेडिया व राहुल-विरोधकांचे ऐकून राहुल गांधी यांच्या विषयी आपले निगेटिव्ह मत बनवतात, ते मोठी चूक करत आहेत. पण राहुल गांधी यांच्या जन्मतारखेवरून सांगता येते की त्यांच्याकडे अनेक गुण आहेत आणि आणि नजिकच्या भविष्यात त्यांना मोठ्या संध्या मिळणार आहेत. 

राहुल गांधी यांची जन्म तारीख 19 जून 1970 आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 1 येतो तर भाग्यांक 6 येतो. त्यांचा नामांक 4 येतो.

जन्मांक:

19=1+9=10=1+0=1

अंकशास्त्रात हा अंक 1 ते 9 या अंकांमध्ये सर्वात चांगला मानला गेला आहे. हा जन्मांक असणारे लोक उपजतपणे नेतृत्व गुण असणारे, लढाऊ, पुढाकार घेणारे, ठाम, उमद्या व्यक्तिमत्वाचे असतात. 

19 तारीख ही विशेष शक्तिशाली असते. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीमध्ये 1 या अंकाचे गुणदोष जास्त प्रमाणात दिसून येतात, तसेच 9 या अंकाचे गुणदोष ही असतात. 9 हा अंक लढाऊ वृत्ती देतो. 
(विशेष म्हणजे राहुल गांधी यांची आज्जी इंदिरा गांधी यांची जन्मतारीखही 19 होती).

भाग्यांक:

19.6.1970= (1+9)+ (6) + (1+9+7+0)= 10+6+17=33=3+3=6

(त्यांच्या RAHUL या नावाचा नामांकही 6 येतो.)
6 भाग्यांक  असणाऱ्या व्यक्तिंना प्रचंड आत्मविश्वास असतो. या व्यक्ति मानवतावादी आणि इतरांची काळजी घेणाऱ्या असतात. हा अंक त्यांच्या जन्मांक 1 चे दुर्गुण कमी करतो.

त्यांच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज 33 येते.  33 हा एक मास्टर नंबर आहे आणि तो त्यांना भावनाशील बनवतो.

नामांक:

R A H U L

9 1 8 3 3 बेरीज 24
G A N D H I
7 1 5 4 8 9 बेरीज 34
24+34= 58 =5+8 =13= 1+3= 4

हा नामांक तर्कनिष्ठ विचार, स्पष्टवक्तेपणा आणि नियोजनबद्ध काम करण्याची क्षमता देतो. 

सोल अर्ज नंबर 5 (नावातील स्वरांची अंकातील किंमत).
5 हा अंक त्यांना चाणाक्ष, चलाख आणि 

पर्सनॅॅलिटी नंबर 44 (नावातील व्यंजनांची अंकातील किंमत)
44 हा एक मास्टर नंबर आहे. हा अंक सत्ता, संपत्ती, नियोजनबद्धता, व्यवस्थापन कौशल्य देतो.
राहुल गांधी यांचे अंक राजकारण क्षेत्रात काम करण्यासाठी योग्यच आहेत. पण उद्योग क्षेत्रात काम केले असते तर ते मोठे आणि यशस्वी उद्योगपति झाले असते!

दोन मास्टर नंबर्स 
राहुल गांधी यांच्या पूर्ण चार्ट मध्ये 2 मास्टर नंबर्स आहेत. एक म्हणजे त्यांच्या जन्म तारखेतील अंकांची बेरीज 33 आहे, आणि त्यांचा पर्सनॅॅलिटी नंबर 44 आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये 2 मास्टर नंबर्स असतील तर ते त्या व्यक्तीला प्रचंड यश मिळवून देऊ शकतात.

2019: पर्सनल इयर 1 
एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्म महिना आणि चालू वर्ष यातील अंकांची बेरीज म्हणजे पर्सनल इयर होय. 2019 हे राहुल गांधी यांच्यासाठी पर्सनल इयर 1 आहे. 19.06.2019 = 1+9+0+6+2+0+1+9   = 28 = 2+8 =10 = 1+0 =1. शिवाय 2019 या सालात 19 हा अंकही आहे, जी राहुल गांधी यांची जन्मतारीख आहे. 2019 या सालातील अंकांची बेरीज 12 = 1+2 = 3 येते. 3 हा अंक त्यांच्या जन्मांक 1 आणि भाग्यांक 6 या दोन्हींशी सुसंगत आहे. एखाद्या वर्षात असे योग जुळून आले तर ती व्यक्ती त्या वर्षात मोठे यश मिळवू शकते. त्यामुळे एकुणात 2019 हे वर्ष राहुल गांधी यांना प्रचंड यश देणारे ठरणार आहे यात कांही शंका नाही. 2019 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान झाले तर त्यात कांही विशेष नाही. 

हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

इंदिरा गांधी
नरेंद्र मोदी
शरद पवार
देवेंद्र फडणवीस
अजित दादा पवार


Sunday, 15 November 2015

शरद पवार

-महावीर सांगलीकर 
Numerologist, Graphologist
8149703595



शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांची जन्म तारीख 12.12.1940 ही आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 3 हा आहे तर भाग्यांक 2 आहे. त्यांच्या Sharad Pawar या नावानुसार त्यांचा नामांक 2 हा आहे. विशेष म्हणजे त्यांचा मासांक  हा  देखील त्यांच्या जन्मांकाएवढा म्हणजे 3 आहे (डिसेंबर=12=1+2=3), तर त्यांचा वर्षांक 5 (1940=1+9+4+0=14=1+4=5) आणि त्यांच्या PAWAR या आडनावाची अंकातली किंमत देखील 5 आहे.


त्यांच्या जन्मांक, भाग्यांक आणि नामांकानुसार त्यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येते:

जन्मांक: 3
जन्मांक 3 असणाऱ्या व्यक्तींच्याकडे प्रचंड आकर्षण शक्ती असते. नेतृत्वगुणाच्या बाबतीत हा अंक 1 या अंकाइतकाच  चांगला मानला जातो. पवार साहेब त्यांच्या नेतृत्व गुणांच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. पण 3 हा जन्मांक असणारे नेते जन्मांक किंवा भाग्यांक 1 असणाऱ्या नेत्यांपुढे दुय्यम ठरतात. (जसे इंदिरा गांधी जन्मांक 1, राजीव गांधी भाग्यांक 1, नरसिंह राव जन्मांक 1. पवार साहेबांना त्यांच्यावर कुरघोडी करता आली नाही). 3 हा जन्मांक असणारे लोक अनेकदा भावनेच्या भरात निर्णय घेतात. असे निर्णय चुकीचे ठरू शकतात. पवार साहेबांच्या बाबतीत ही गोष्ट अनेकदा घडलेली दिसते.

पवार साहेबांच्या कन्या सुप्रियाताई यांचा जन्मांकही 3 आहे. (जन्मतारीख 30 जून). असे असणे योगायोग वगैरे नसते, तर एखाद्या व्यक्तीची मुलगी अथवा मुलगा त्या व्यक्तीच्याच जन्मांकाचा असण्याची जास्त शक्यता असते.

भाग्यांक: 2 
2 हा अंक मुत्सद्दीपणा, कुशल वक्तृत्व, व्यवहार कुशलता  यांच्याशी संबधित आहे. या व्यक्ति मृदुभाषी असतात. पण या अंकाची दुसरी बाजू म्हणजे चंचलपणा, धरसोड वृत्ती आणि ऐनवेळी माघार घेण्याची वृत्ती. पवार साहेबांच्या बाबतीत 2 या अंकाचे गुण आणि दोष हे दोन्ही मोठ्या प्रमाणात दिसतात.

नामांक: 2 (11)
पवार साहेबांचा नामांक त्यांच्या भाग्यांकाएवढाच म्हणजे 2 आहे. हा नामांक त्यांच्या भाग्यांक 2चे गुणदोष वाढवतो.

S H A R A D
1  8  1 9  1  4  (या अंकांची बेरीज 24=2+4=6)

P A W A R
7 1   5  1  9   (या अंकांची बेरीज 23=2+3=5)
 6+5 =11=1+1=2

त्यांचा नामांक काढत असताना  त्यात 11 हा अंक येतो. हा एक मास्टर नंबर आहे. तो त्यांना अंतर्मुख बनवतो, तसेच प्रचंड यशही देतो. तसेच त्यांच्या पूर्ण नावात 1 हा अंक 5 वेळा आला आहे, तर 12.12.1940 या त्यांच्या जन्मतारखेत तो 3 वेळा आला आहे. म्हणजे पवार साहेबांच्या चार्टमध्ये 1 हा अंक एकूण 8 वेळा आला आहे. 1 या अंकाचे हे मोठे रिपिटेशन त्यांचे नेतृत्वगुण  मोठ्या प्रमाणात वाढवते.

शरद पवार यांची सही:
कोणत्याही व्यक्तीच्या सहीमध्ये त्या व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ठयांची लक्षणे दिसून येतात. शरद पवारांच्या सहीमध्येदेखील त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये दिसून येतात. त्यांची पुढे दिलेली सही पहा:









या सहीची बेसलाईन ठिपकेदार रेघेत  दाखवली आहे. सहीमध्ये श, आणि प या अक्षरांचा मोठा भाग बेसलाईनच्या खाली उताराला आहे. एखाद्या व्यक्तीच्या सहीमध्ये  असे खाली येणे असेल तर निश्चितच समजावे की त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात या ना त्या प्रकारे मोठे सेटबॅक्स मिळत रहातील. पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत असे सेटबॅक्स वारंवार मिळालेले दिसतात.

या सहीमध्ये श आणि प या अक्षरात मोठी वर्तुळे तयार झाली आहेत. ही वर्तुळे म्हणजे पवार साहेब आपल्या मनाचा, पुढील चालींचा थांगपत्ता लागून देत नाहीत त्याच्या खुणा आहेत.

श, प, व या अक्षरात फुल्या (क्रॉसेस) आहेत. या फुल्या म्हणजे त्यांच्याकडून झालेल्या व होत असलेल्या राजकीय व इतर चुकांच्या आणि येणाऱ्या अडथळ्यांच्या खुणा आहेत.

सहीमधले  प  हे अक्षर पहा.  ते अक्षर पुढे जाऊन वरच्या दिशेने गेले आहे, मग ते अचानक मागे वळले आहे व स्वत:लाच क्रॉस करून खाली घसरले आहे. 'पवार' मधील व या अक्षरात देखील मागे वळणे हा प्रकार दिसतो. पवार साहेब कधी काय भूमिका घेतील ते सांगता येत नाही त्याचेच हे लक्षण आहे.  शरद पवार कोलांटी उडी घेतात त्याचे  हे लक्षण आहे. तसेच सहीमध्ये अचानक मागे वळणे हे  बॅकफूटवर  जावे लागण्याचे लक्षण आहे.

पवार साहेबांच्या या सहीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सही मधली अक्षर सुट्टी-सुट्टी आहे. सहीमध्ये अशी सुट्टी-सुट्टी अक्षरे असणारी व्यक्ती इतरांच्यात फारशा गुंतून रहात नाही.




हेही वाचा:

इंदिरा गांधी
नरेंद्र मोदी
मोदींच्या सहीमध्ये दडलंय त्यांचं भवितव्य
देवेंद्र फडणवीस
अजित दादा पवार
तुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख