14 तारीख, जन्मांक/भाग्यांक 5 आणि राजकारणी
-महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
फोन: 8149703595
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंमध्ये, तसेच ज्यांच्या पूर्ण जन्म तारखेची एक अंकी बेरीज 5 येते, (म्हणजेच ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 5 आहे अशा व्यक्ती) त्यांच्यात लोकसमुहांवर प्रभाव टाकण्याची, समूहांचे मेंदू ताब्यात घेण्याची कला कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. जन्मांक 5 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, सुभाष चंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, डोनाल्ड ट्रम्प, संजय गांधी, राज ठाकरे वगैरे. भाग्यांक 5 असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे अडॉल्फ हिटलर, बॅरीस्टर मोहंमद अली जिना, नरेंद्र मोदी. या सगळ्यांनी समूहमने ताब्यात घेतली हे दिसून येते.
डोनाल्ड ट्रम्प, राज ठाकरे आणि अकबरुद्दीन ओवेसी या तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या व्यक्ति. पण यांच्यातलं साम्य म्हणजे हे तिघंही विवादास्पद वक्तव्य देण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. हे तिघंही एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करणारं राजकारण करतात. विशेष म्हणजे या तिघांचीही जन्मतारीख 14 जून आहे!
अंकशास्त्रानुसार 14 म्हणजे 5. (1+4=5). वर उल्लेख केलेल्या तीनही व्यक्तिंचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे राज ठाकरे ज्या मुंबईहून सूत्रे हलवतात, त्या मुंबईचा नामांक 5 आहे, (MUMBAI= 4+3+4+2+1+9= 23 =2+3 =5), तर अकबरुद्दीन ओवेसी ज्या हैद्राबाद इथून राजकारण करतात त्या हैदराबादचा नामांकही 5 आहे. (HYDERABAD= 8+7+4+5+9+1+2+1+4 = 41 =4+1=5 ). डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क इथं रहातात आणि न्यूयॉर्कचा नामांक 3 असला तरी त्यातल्या NEW या शब्दात 5 हा अंक 3 वेळा आला आहे आणि हेट पॉलिटिक्सच्या जोरावर ते ज्या अमेरिकेचे अध्यक्ष बनले आहेत त्या अमेरिकेचा नामांकही 5 आहे. (USA = 3+1+1 =5, AMERICA = 1+4+5+9+3+1= 32= 3+2 =5).
पण इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 14 तारखेस जन्मलेल्या सगळेच कांही द्वेषाचं राजकारण खेळत नाहीत. जन्मतारखेबरोबरच पूर्ण जन्मतारखेची बेरीज किती येते आणि ती व्यक्ति ज्या शहरात रहाते त्यावरही बरेच कांही अवलंबून असते.
हेही वाचा:
वैयक्तिक सल्ला
करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.
मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.
महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App
गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख
-
-महावीर सांगलीकर मोबाईल नंबर: 9145318228 अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तिची जन्मतारीख आणि नाव यावरून त्या व्यक्तीचे गुण, दोष, स्वभाव ओ...
-
महावीर सांगलीकर मोबाईल फोन: 814 970 3595 प्रत्येक व्यक्तिचे खास मित्र, विश्वासू व्यक्ति, जवळचे सहकारी हे त्या व्यक्तिच्या जन्मतारखेस अ...
-
महावीर सांगलीकर मोबाईल नंबर 914 531 8228 मास्टर नंबर्स मध्ये 22 हा मास्टर नंबर सगळ्यात जास्त शक्तिशाली मानला जातो. तुमची जन्म तारीख 2...
-
-महावीर सांगलीकर मोबाईल फोन: 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंमध्ये, तसेच ज्यांच्या पूर्ण ...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 आपल्या दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी गाडीसाठी कोणता नंबर असावा? याचे कांही सोपे नियम आहेत. पहिली गोष्ट म्...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 एखाद्या व्यक्तिचे विश्लेषण करण्यासाठी अंकशास्त्रात तिच्या जन्मतारखेचा, तर फेसरीडिंगमध्ये चेहऱ्याचा अभ्या...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 माझ्या एका मित्राला स्वप्नात दिसले की तो मरून पडला आहे. वरवर बघितले तर हे एक भीतीदायक स्वप्न वाटतं. पण प्...
-
--महावीर सांगलीकर तुमच्या बाळासाठी अंकशास्त्रानुसार योग्य नाव सुचवण्यासाठी पुढील माहिती पाठवावी: -बाळाची पूर्ण जन्मतारीख -मुलगा क...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 * कांही लोक त्यांचं तुमच्याकडं कांही काम असलं तरच तुमच्याशी संपर्क साधतात. त्यांचं काम झालं की ते तुम्हाला...
-
-महावीर सांगलीकर Numerologist, Graphologist 8149703595 शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्ति...
No comments:
Post a Comment