Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday 25 April 2015

मास्टर नंबर 22

महावीर सांगलीकर 
मोबाईल नंबर 914 531 8228

मास्टर नंबर्स मध्ये 22 हा मास्टर नंबर सगळ्यात जास्त शक्तिशाली मानला जातो. तुमची जन्म तारीख 22 असेल किंव्चा तुमच्या पूर्ण जन्म तारखेची दोन अंकी बेरीज 22 येत असेल तर तुमच्या चार्टमध्ये हा मास्टर नंबर आहे.

या नंबरला मास्टर बिल्डर नंबर म्हणूनही ओळखले जाते. या मास्टर नंबरचे गुण म्हणजे हा तुम्हाला ‘कंस्ट्रक्टिव्ह’ बनवतो. या अंकात 11 या मास्टर नंबरचे अनेक गुण आणि 4 या अंकाचे गुण असतात. त्यातून तुम्हाला मोठ मोठी कामे करण्याची व करवून घेण्याची प्रेरणा आणि ताकत मिळते.  या नंबरमध्ये 2 आणि 4 या दोन्ही अंकांचे गुण मोठ्या प्रमाणात आलेले दिसतात. या व्यक्तिंकडे संघटनशक्ति, व्यवस्थापन, विश्लेषक दृष्टी, स्पष्टवक्तेपणा, लोकसंग्रह हे गुण जास्त प्रमाणात दिसतात. त्यांनी लोकोपयोगी कामे केली तर त्यात त्यांना प्रचंड यश मिळते.

ज्यांच्याकडे हा नंबर आहे त्या व्यक्ति सहसा मनी ओरिएंटेड नसतात. पण त्यांनी प्रयत्न केल्यास त्यांच्याकडे प्रचंड धन आणि संपत्ती येते.

त्यांनी त्यांच्या वरील गुणांचा वापर न केल्यास किंवा तशी संधी आणि वातावरण त्यांना न मिळाल्यास त्यांना प्रचंड तणावाला आणि समस्यांना सामोरे जावे लागते.

ज्यांच्याकडे हा मास्टर नंबर आहे, त्यातील अनेक व्यक्ति या अंकाच्या गुणांचा फारसं वापर करत नसल्याचे दिसते.

हा मास्टर नंबर ज्यांना जन्मांक किंवा भाग्यांक म्हणून लाभला, अशा कांही व्यक्ति म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज, महाराजा उदयसिंह, राणा प्रताप, राजा राम मोहन रॉय, कर्मवीर भाऊराव पाटील, सर ऑर्थर कॉनन डॉयल.


हेही वाचा:

3 comments:

  1. Sir my name is MANISH RAVILAL SANGOI D O B 22/8/1971 but from last 3 years I am facing problem. My email if sangoimanish@gmail.com

    ReplyDelete

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख