Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Showing posts with label जन्मांक. Show all posts
Showing posts with label जन्मांक. Show all posts

Wednesday, 7 September 2016

तुमची जन्मतारीख आणि तुमचा जन्मांक

पुढील लिंक्सवर त्या-त्या जन्मांकाच्या  गुणदोषांची चर्चा केली आहे:


हेही वाचा:

Saturday, 23 April 2016

तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्या जन्मांकाच्या गुण दोषांची माहिती


तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्या जन्मांकाच्या गुणदोषांची माहिती 


हेही वाचा:

Saturday, 7 February 2015

छत्रपती शिवाजी महाराज अंकशास्त्राच्या नजरेतून

 © महावीर सांगलीकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे झाला. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख 'युनिक' प्रकारची आहे.

19 हा अंक अंकशास्त्रात 1+9=10=1+0=1 असा होतो. याला जन्मांक (Birth Number) असे म्हणतात. जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मले त्या सगळ्यांचा जन्मांक 1 येतो. अंकशास्त्रानुसार 1 हा अंक सर्वात चांगला व महत्वाचा अंक मानला गेला आहे. ज्यांचा जन्मांक 1 असतो त्या व्यक्ति स्वयंभू, दूरदृष्टीचे, महत्वाकांक्षी, प्रचंड नेतृत्वगुण असणारे, हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेणारे, दुय्यम स्थान न स्वीकारणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला महत्व देणारे, शिस्तप्रिय असे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्यात हे सगळेच गुण एकवटलेले दिसतात.

अंकशास्त्रात जन्मांकाप्रमाणेच  भाग्यांकाला (Life Path Number)  देखील महत्व आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्म तारखेतील सर्व अंकांची बेरीज. महाराजाची जन्मतारीख 19.2.1630 आहे. यातील अंकांची बेरीज 1+9+2+1+6+3+0=22 अशी येते. 22 हा नंबर मास्टर नंबर मानला गेला आहे आणि तो फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येतो. शिवाय जन्मांक 1 आणि भाग्यांक 22 ही तर फारच दुर्मिळ गोष्ट.

जन्मांक आणि भाग्यांक हे दोन्ही त्या-त्या व्यक्तीच्या जीवनात घडणा-या घटनांवर प्रभाव टाकतात. तसेच पूर्ण जन्मतारखेत एखादा अंकगट दिसत असेल तर त्यातील अंकही घटनांवर प्रभाव टाकतात. 19.2.1630 या जन्मतारखेत 3,6,9 हे एका गटातील तीनही अंक आलेले दिसतात. तसेच 1630 यातील सर्व आकड्यांची बेरीज 1 होते. (बहुतेकांच्या बाबतीत त्यांच्या जीवनात कांही ठराविक तारखा रिपीट होत असलेल्या दिसतात).

आता आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पाहिल्या तर त्या ज्या तारखेची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसतात. पुढील घटना पहा:

(ज्या सालांच्या खाली रेघ आहे, त्या सालातील अंकांची बेरीजही 1, 3, 6 किंवा 9 येते. ती त्या-त्या सालापुढे कंसात दिली आहे. ज्या महिन्यांच्या खाली रेघ आहे, ते महिने जानेवारी, मार्च, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा डिसेंबर असे आहेत. म्हणजे  पहिला, तिसरा, सहावा, नववा, दहावा किंवा बारावा महिना ).

जन्म: 19 फेब्रुवारी 1630  (1)

जावळी ताब्यात घेतली: 15 जानेवारी 1656   (9)

रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9)

अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 नोव्हेंबर 1659 (3)

प्रतापगडचे युद्ध:  10 नोव्हेंबर 1659 (3)
कोल्हापूरचे युद्ध: 28 डिसेंबर 1659 (3)
मोगल सरदार करतलब खान याचा पराभव केला: 3  फेब्रुवारी 1661
सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी 1664
सिंधुदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला: 24 नोव्हेंबर1664
औरंगजेबाच्या दरबारात: 12 मे 1666 (1)
आग्र्याहून सुटका: 19 ऑगस्ट 1666 (1)
राजाराम महाराजांचा जन्म: 24 फेब्रुवारी 1670 
तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला: 15 मार्च 1670
पुरंदर किल्ला पुन्हा घेतला: 24 मार्च 1670
सुरतेवर दुसरी स्वारी: 3 ऑक्टोबर 1670
राज्याभिषेक: 6 जून  1674  (9)
दुसरा राज्याभिषेक: 24 सप्टेंबर 1674 (9)
जिजाउंचा मृत्यू: 18 जून 1674 (9)
महाराजांचा मृत्यू: 3 एप्रिल 1680  (6)

विशेष म्हणजे महाराजांचे वडील शहाजीराजे यांची जन्म तारीख 18 मार्च तर आई जिजाउंची जन्म तारीख 12 जानेवारी ही होती.

याशिवाय महाराजांच्या आयुष्यातील कांही महत्वाच्या घटना ज्यांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसत नाहीत, पण त्या ज्या साली घडल्या, त्या सालातील अंकांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते. त्या घटना अशा:

पुरंदर किल्ला घेतला: 1648=1+6+6+8=21=2+1=3
संभाजी महाराजांचा जन्म: 1657=1+6+5+7=19=1+9=10=1+0=1
सईबाई यांचा मृत्यू : 1659=1+6+5+9=21=2+1=3  
पुरन्दरचा तह: 1665 = 1+6+6+5 = 18 =1+8 = 9
नेसरीची लढाई: 1674=1+6+7+4=18=1+8 =9
एकोजी राजांचा पराभव: 1677 =1+6+7+7=21=2+1=3

Friday, 6 February 2015

अंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा

-महावीर सांगलीकर
8149703595 


अनेकांचा अंकशास्त्रावर अजिबात विश्वास नाही असे दिसते. त्यामागे अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र आहे असा त्यांचा समज असणे हे एक मोठे कारण आहे., अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र हे खोटे असते असा असणारा समज  आणि म्हणून अंकशास्त्र हे देखील खोटे असते अशी त्यांची बालबोध समजूत असावी. असो.

ज्यांना अंकशास्त्राचा खरेखोटेपणा स्वत:च तपासून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी इथे मी कांही प्रयोग देत आहे.

प्रयोग पहिला: तुमच्या खास मित्रांची एक यादी बनवा. प्रत्येकाच्या नावापुढे त्याची जन्मतारीख लिहा. मग या जन्मतारखांचा थोडा अभ्यास करा. आपल्याला असे दिसून येईल की या जन्मतारखांमध्ये विशिष्ट तारखा असलेल्यांचे प्रमाण खूपच जास्त आहे, आणि या तारखा तुमच्या जन्मांकांशी संबंधीत आहेत. म्हणजे समजा तुमची जन्मतारीख 16 आहे, तर तुमचा जन्मांक 7 येतो, आणि तुमचे खास मित्र हे जास्त करून 7, 16 अथवा 25 तारखेस जन्मलेले असतील (कारण या सर्वांचा जन्मांक 7 आहे), किंवा मग ते जन्मांक 1 किंवा 5 असणारे म्हणजे 1, 5, 10, 14, 19, 23, 28 या तारखांना जन्मलेले असतील. (जन्माक 1, 5 आणि 7 हे अंकशास्त्रात मित्र नंबर आहेत).

वरील तारखांची एकून संख्या ही 10 आहे. शक्यतेच्या नियमाप्रमाणे तुमच्या खास मित्रांच्या संख्येत या तारखांना जन्मलेल्या मित्रांची संख्या  10/31 म्हणजे सुमारे 33 टक्के पाहिजे. पण प्रत्यक्षात त्यांची संख्या खूपच जास्त दिसते. याचे कारण म्हणजे आपण जरी जन्मतारखा बघून मैत्री करत नसलो तरी आपले मित्र हे जास्त करून आपल्या जन्मांकाशी संबंधीत तारखांना जन्म झालेलेच असतात. हे कसे घडते हा संशोधनाचा विषय आहे.

प्रयोग दुसरा: तुमच्या आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घटनांची एक यादी बनवा. जसे, तुम्हाला पहिली नोकरी लागली ती तारीख, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला ती तारीख, तुम्ही गाडी घेतली ती तारीख, तुमच्या लग्नाची तारीख, तुम्हाला पहिले मूल झाले ती तारीख, तुम्ही नवीन घर घेतले, तिथे रहायला गेलात त्या तारखा, तुमच्या पहिल्या परदेश प्रवासाची तारीख वगैरे. या तारखा तपासून पाहिल्या तर तुम्हाला असे दिसून येईल की वरील प्रकारच्या घटनांपैकी बहुतेक घटना या ठराविक तारखांनाच घडलेल्या आहेत, आणि त्या तारखा तुमच्या जन्मांकाशी संबधीत आहेत.

प्रयोग तिसरा: तुमच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला जे नंबर आले त्यांचीही एक यादी बनवा. तुम्ही लहानपणी ज्या घरात रहात होता त्या घराचा नंबर, मोठेपणी तुम्ही ज्या घरात रहायला गेलात त्या घराचा नंबर, तुमच्या गाडीचा नंबर, तुमच्या पासपोर्टचा नंबर, ब्यांकेचा खाते नंबर, वगैरे. असे जेवढेही नंबर असतील, त्यात पुन्हा तुम्हाला असे दिसून येईल की वर दिलेले विशिष्ट अंक येथेही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

प्रयोग चौथा: तुम्हाला आवडणारे हिरो, हिरोइनी, राजकीय नेते, महापुरुष, आदर्श व्यक्ति यांची एक यादी बनवा.  त्यांच्या नावापुढे  त्यांच्या जन्मतारखा लिहा. इथंही तुम्हाला असं दिसेल की या यादीत तुमचाच जन्मांक असणारे लोक जास्त प्रमाणात आहेत.

यावरून तुम्हाला असे दिसून येईल की आपल्या आयुष्यात कांही विशिष्ट नंबर हे मोठ्या प्रमाणावर रिपीट होत असतात. अशा या रिपिटेशनचा अभ्यास, निरीक्षणे आणि त्यानुसार संबंधित व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करणे म्हणजेच अंकशास्त्र होय.

हेही वाचा:

अंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन

-महावीर सांगलीकर
Mobile Phone 8149703595


अंकशास्त्राला किमान पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन काळी पश्चिम आशियातील यहुदी लोक अंकशास्त्राचा वापर करत असत. प्राचीन चीनमध्येही अंकशास्त्र विकसित झाले होते. त्याच प्रमाणे प्राचीन भारतातही अंकशास्त्राचा उपयोग केला जात असे.

प्राचीन ग्रीसमधील प्रसिद्ध गणिती आणि तत्वज्ञ पायथ्यागोरस हा युरोपिअन अंकशास्त्राचा जनक मानला जातो.

अंकशास्त्रामागील संकल्पना

प्रत्येक व्यक्तिची जन्मतारीख म्हणजे एक अंक असतो. प्रत्येक अंकाचे कांही गुण आणि कांही दोष असतात. या अंकाचा त्या-त्या व्यक्तीच्या स्वभावावर, विचार करण्याच्या पद्धतीवर आणि त्यामुळे जीवनावर प्रभाव पडत असतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, तिचा स्वत:कडे व इतरांकडे पहाण्याचा दृष्टीकोन, येणा-या परिस्थितीला ती व्यक्ति कशा प्रकारे सामोरी जाईल आणि आणि ती व्यक्ति कोणत्या प्रकारचे जीवन जगेल याचा साधारण अंदाज बांधता येतो. हा अंदाज बांधण्यासाठी 1 ते 9 या अंकांचा वापर केला जातो.

जन्मांक
जन्मांकाला इंग्रजीमध्ये BirthBirth Number, Basic Number  या नावाने ओळखले जाते. व्यक्तिची जी जन्म तारीख असते ती जर एक अंकी असेल, म्हणजे 1 ते 9 दरम्यानची असेल तर ती तारीख हाच त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. जर ती तारीख दोन अंकी असेल, म्हणजे 10 ते 31 या ताराखांमधील असेल तर त्या तारखेतील अंकाची बेरीज करून तिला एक अंकी बनवले जाते, व तो अंक म्हणजे त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख 1 असेल तर तुमचा जन्माक 1 असतो, तसेच जर तुमची जन्मतारीख 10 असेल तर या तारखेतील अंकांची बेरीज 1+0=1 येते, म्हणून तेंव्हाही तुमचा जन्मांक 1 असतो. हाच प्रकार तुमचा जन्म 19 किंवा 28 तारखेस झाला असेल तर होतो. (19=1+9=10=1+0=1, तसेच 28=2+8=10=1+0=1).

जन्मांक हा केवळ तारखेवर अवलंबून असतो, ती व्यक्ति कोणत्या महिन्यात अथवा कोणत्या वर्षी जन्मली याचा जन्मांकाशी संबंध येत नाही.

भाग्यांक

भाग्यांकाला Life Path Number, Fortune Number, Destiny Number इंग्रजीमध्ये म्हणतात. व्यक्तीच्या संपूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची एक अंकी बेरीज म्हणजे त्या व्यक्तीचा भाग्यांक होय. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 15 जानेवारी 1984 रोजी झाला असेल तर ती तारीख 15.1.1985 अशी होते, आणि या तारखेतील सर्व अंकांची एक अंकी बेरीज 3 होते (1+5+1+1+9+8+5=30=3+0=3) म्हणून त्या व्यक्तीचा भाग्यांक 3 असतो.

एखाद्या व्यक्तीचे वाचन करण्यासाठी जन्मांक आणि भाग्यांक या दोन्हींचा वापर केला जातो. प्रत्येक जन्मांक आणि भाग्यांक यांची वैशिष्ठ्ये, गुण, दोष हे वेगवेगळे असतात.

नामांक
नामांकाला इंग्रजीत Name Number  म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या जन्मतारखेप्रमाणेच त्याच्या नावाचाही परिणाम होत असतो. त्यामुळे अंकशास्त्रात व्यक्तीचे वाचन करण्यासाठी त्याच्या नावाचाही विचार केला जातो. त्यासाठी नावाच्या स्पेलिंगवरून त्या नावाची अंकामधील किम्मत काढली जाते. अशी किम्मत काढण्यासाठी वापरली जाणारी सोपी पद्दत म्हणजे नावाच्या इंग्रजी स्पेलिंग मधील अक्षरांचे त्यांच्या अल्फाबिट्स मधील स्थानानुसार अंकांमध्ये रुपांतर करायचे व त्यांची बेरीज करायची. उदाहरणार्थ, AJAY हे नाव घ्या. या नावाचे अंकात रुपांतर असे होते:

A=1
J=10=1
A=1
Y=25=7
1+1+1+7=10=1

त्यामुळे अजयचा नामांक 1 येतो. नामांकाचे वाचन करताना केवळ 1 ते 9 एवढेच अंक विचारात घेतले जात नाहीत, तर नामांक काढताना जी दोन अंकी बेरीज येते, त्या अंकांचाही विचार केला जातो.

जन्मांक, भाग्यांक आणि नामांक हे तीनही एकेमेकांना अनुरूप आणि पूरक असतील तर ते त्या व्यक्तीच्या फायद्याचे असते. या तीन अंकांपैकी दोन किंवा तीनही अंक समान असतील तर त्या व्यक्तीमध्ये त्या अंकाचे गुणदोष मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. याउलट हे तीनही अंक वेगवेगळे असतील तर त्या व्यक्तीमध्ये त्या-त्या अंकांचे गुणदोष दिसून येतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे अंकशास्त्रीय वाचन करताना तिचा जन्मांक, भाग्यांक आणि नामांक या तिन्ही अंकांचा विचार करणे गरजेचे असते.

अंक आणि  त्यांचे गुणदोष

आता आपण अंक आणि त्यांचे गुणदोष थोडक्यात पाहू:

1: महत्वाकांक्षा, पुढाकार, आक्रमकता, विजय
2: चंचलता, धरसोडवृत्ती, उदारता,  रोमान्स  
3: उत्साही, शिस्तप्रिय, हुशार, यशस्वी 
4: तर्कनिष्ठता, फटकळपणा, बहिर्मुखता, कलह
5: मैत्रीभाव, प्रेम, रोमान्स, झटपट विचार आणि निर्णयक्षमता  
6: यशस्वी, विश्वासपात्र, आग्रही,  कौटुंबिकता
7: बेचैनपणा, उद्यमशीलता, अंतर्मुखता
8: उशीर, संपत्ती, उदासीनता  
9: लढाऊपणा, दीर्घ संघर्षातून यश, बहिर्मुखता   

अंकशास्त्राचा उपयोग
एखाद्या व्यक्तीच्या अंकशास्त्रीय वाचनावरून त्याचे मूलभूत गुण आणि दोष कळल्यामुळे त्यानुसार त्या व्यक्तीला आपल्या गुणांचा विकास आणि दोषांना काबूत ठेवण्याविषयी मार्गदर्शन करता येते. त्याला कोणते शिक्षण, रोजगार, व्यवसाय फायदेशीर ठरतील हे ठरवता येते. आयुष्याचा जोडीदार, व्यवसायातील भागीदार निवडताना अंकशास्त्राचा उपयोग होतो. एखाद्या व्यक्तीस कोणती वर्षे, कोणत्या तारखा अनुकूल अथवा प्रतिकूल असू शकतात याचा अंदाज बांधता येतो.

अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे. ज्योतिषशास्त्रात व्यक्तिची जन्मवेळ अचूक माहीत असावी लागते. अंकशास्त्रीय वाचनाला जन्मवेळेची गरज नसते तर केवळ पूर्ण जन्म तारीख आणि व्यक्तीचे नाव या गोष्टीच महत्वाच्या असतात. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तिची खरी जन्मतारीख माहीत नसेल तर त्याची कागदोपत्रीय तारीख देखील अंकशास्त्रीय वाचनाला चालू शकते.

कांही लोक अंकशास्त्राचा संबंध ज्योतिषशास्त्राशी जोडतात, पण ते चुकीचे आहे. कारण अंकशास्त्राचा संबंध ग्रहगोलांशी नसून अंकांशी आहे. प्रसिद्ध ज्योतिषी किरो याने म्हंटले होते की ज्योतिषशास्त्र, हस्त सामुद्रिक यांच्यापेक्षा अंकशास्त्र हे जास्त उपयोगी पडते.

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख